By  
on  

पाहा Video : गायिका नेहा राजपाल आणि वैशाली सामंतसह या गायिकांनी गायलं 'वुमनिया', लवकरच होणार प्रदर्शित

महिला दिनाच्या निमित्ताने अनेक विशेष गोष्टी सध्या पाहायला मिळत आहेत. काही ठिकाणी महिला दिन कार्यक्रम होत आहेत तर काही महिला दिनानिमित्ताने विविध गोष्टी घेऊन येत आहेत. प्रसिद्ध गायिका नेहा राजपाल आणि इतर गायिका मिळून खास गाणं तयार केलं आहे. 'वुमनिया' असं या गाण्याचं नाव असून नुकताच या गाण्याचा टीझर प्रदर्शित करण्यात आालाय.

 

महिला दिनाच्या निमित्ताने या प्रसिद्ध गायिकांनी वुमनिया हे नवं गाणं गायलं आहे. गायिका डॉ. नेहा राजपाल, वैशाली सामंत, अश्विनी शेंडे, योगिता चितळे, योगिता गोडबोले, अमृता नातू, अक्षता सावंत आणि इतर महिलांनी मिळून हे खास गाणं तयार केलं आहे. 

 

या गाण्याच्या व्हिडीओत या गायिका एकत्र गात असल्याचं पाहायला मिळतय.गायिका डॉ. नेहा राजपाल यांनी या गाण्याचा टीझर सोशल मिडीयावर शेयर केला आहे. त्या लिहीतात की, "आम्ही अशाप्रकारे महिला दिन साजरा करण्याचं ठरवलं." लवकरच हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीला येईल. 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive