मराठी सिनेसृष्टीतील हॅपनिंग कपल सखी गोखले आणि सुव्रत जोशी नुकतेच विवाहबंधनात अडकले. त्यांच्या लग्नाच्या फोटोजवर लाईक्सचा वर्षावही झाला. नवी नवरी बनलेल्या सखीचे माहेरीच नाही तर सासरीही चांगलंच कोडकौतुक सुरु आहे. सखीला तिच्या सासूबाईंनी एअरपॉड्स गिफ्ट दिले आहेत. लग्नानंतर पहिल्यांदाच सासूबाईंकडून एअरपॉड्स गिफ्ट्स मिळाल्याने सखी भलतीच खुश झाली आहे.
[video width="640" height="1136" mp4="https://marathi.peepingmoon.com/wp-content/uploads/2019/04/WhatsApp-Video-2019-04-13-at-10.54.52-PM.mp4"][/video]
11 एप्रिल रोजी सखी-सुव्रत लग्नबेडीत अडकले.. मध्यंतरी सुव्रत अनेक सिनेमांच्या शूटींगमध्ये आणि अमर फोटो स्टुडिओच्या प्रयोगांमध्ये बिझी होता. तर सखीने परेदेशी शिक्षणासाठी अमर फोटो स्टुडिओ या नाटकातून एक्झीट घेतली. त्यामुळे दोघेही बराच काळ एकमेकांपासून लांब होते पण त्यांच्यातलं प्रेम तसूभरही कमी झालेलं नाही. लग्नाच्या फोटोमध्ये त्यांच्यातील केमिस्ट्री दिसून येत आहे.