By  
on  

आमीर खान-किरण राव यांचा नवीन टीव्ही शो ‘तुफान आलंया’

मिस्टर पर्फेक्शनिस्टचं बिरुद मिरवणारा आमीर खान सध्या आणखी एका खास कारणामुळे चर्चेत आहे. आमीर सध्या चर्चेत आहे ते ‘पाणी फाउंडेशन’च्या कामामुळे. आमीर या कामाशी संबंधित एक टिव्ही शो पत्नी किरण रावसहित होस्ट करणार आहे. ‘तुफान आलंया’ असं या शोचं नाव आहे.

https://www.youtube.com/watch?time_continue=2684&v=RHV8AoOcBy0

आमीरने महाराष्ट्रातील गावांना दुष्काळमुक्त करण्यासाठी ‘पाणी फाउंडेशन’च्या मदतीने साद घातली. याला अनेक गावातून उत्तम प्रतिसाद मिळाला. आमीरचा हाच प्रवास या शोच्या माध्यमातून दिसणार आहे. यामध्ये आमीर उत्तम मराठी बोलताना दिसत आहे. आमीर ने या शोचा पहिला एपिसोड सोशल मिडियावर पोस्ट केला आहे. या शो युट्युबवर देखील पाहता येऊ शकतो. आमीरसोबत या शोमध्ये काही मराठी कलाकारही दिसत आहेत.

Recommended

PeepingMoon Exclusive