By  
on  

पाहा Video : महाशिवरात्री निमित्ताने या अभिनेत्रीने सादर केली शिव वंदना

महाशिवरात्री निमित्ताने सोशल मिडीयावर अनेक पोस्ट पाहायला मिळत आहेत. अनेक शिवभक्तांनी त्यांचं शिवप्रेम सोशल मिडीयावरही व्यक्त केलं आहे. यात मनोरंजन विश्वातील कलाकारांच्याही अनेक पोस्ट पाहायला मिळत आहेत. आजच्या शुभ दिवसाचं औचित्य साधुन एका अभिनेत्रीने शिव वंदना सादर केली आहे. 

फुलाला सुंगध मातीचा या मालिकेतील किर्तीची भूमिका साकारणारी अभिनेत्री समृद्धी केळकर ही एक उत्तम नृत्यांगना आहे. आणि म्हणूनच महाशिवरात्रीच्या निमित्ताने समृद्धी शिव वंदना सादर केली आहे. महाशिवरात्री विशेष भागासाठी समृद्धीने खास पांढऱ्या साडीतील लुक केला होता.

 

या पेहरावात समृद्धीने सुंदर शिव वंदना सादर करतानाचा व्हिडीओ सोशल मिडीयावर शेयर केला आहे. "महाशिवरात्री निमित्त प्रस्तुत आहे शिव वंदना..." असं लिहून समृद्धीने हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. अनेकांना समृद्धीचा हा व्हिडीओ प्रचंड आवडला आहे. 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive