काही दिवसांपूर्वीच अभिनेत्री धनश्री काडगावकरने गोंडस बाळाला जन्म दिला. बाळाच्या आगमनानंतर त्यांच्या कुटुंबात आनंदाचं वातावरण आहे. सोशल मिडीयावरही धनश्री बाळासोबतचे फोटो शेयर करताना दिसतेय. कधी बाळासोबतचा फोटो तर कधी व्हिडीओ.
नुकतच धनश्रीने एक व्हिडीओ शेयर केला आहे. बाळासाठी ती कशी दिवसभर शिफ्ट करत असते ते या पोस्टमध्ये सांगतेय. शिवाय बाळाला झोपावण्यासाठी त्याला हातात घेऊन नाचत, थोपटवत ती झोपवते. या व्हिडीओतही धनश्री बाळाला झोपावताना दिसतेय.
धनश्री या पोस्टमध्ये लिहीते की, "संध्याकाळी 7 ते सकाळी 7 ची शिफ्ट... 7pm to 7am आणि हा अजून एक प्रयत्न होता त्याला झोपवण्याचा..." 'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेत धनश्री नंदिता वहिनीची नकारात्मक व्यक्तिरेखा साकारत होती. प्रेग्नंसीदरम्यान धनश्रीने या मालिकेचा निरोप घेतला. आता ही मालिका जरी संपली असली तरी या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे.