By  
on  

पाहा Photo : सिद्धार्थ जाधवने शेयर केला त्याच्या आयुष्यातला सर्वात सुंदर फोटो

सोशल मिडीयावर मनोरंजन विश्वातील कलाकारांचे विविध फोटोशुट पाहायला मिळतात. अनेक सेलिब्रिटी त्यांचे खास फोटोशुट सोशल मिडीयावर शेयर करतात. अभिनेता सिद्धार्थ जाधवही त्याचे विविध फोटोशुट त्याच्या चाहत्यांसाठी सोशल मिडीयावर पोस्ट करतो. मात्र नुकताच त्याने एक खास फोटो शेयर केला आहे. 

सिद्धार्थ जाधवचा हा फोटो प्रसिद्ध फोटोग्राफर तेजस नेरुरकरने क्लिक केला आहे. सिद्धार्थला या फोटोमुळे त्याच्या लहानपणाची आठवण झाली आहे. त्याने एक भावुक करणारं कॅप्शनही लिहीलं आहे. या फोटोत एक लहान मुलगा सिद्धार्थच्या बाजुला बसला आहे. या फोटोतून सिद्धार्थला त्याचं लहानपण त्याच्या शेजारी बसल्याचा भास होत असल्याचं त्याने कॅप्शनमध्ये लिहीलय. 

 

सिद्धार्थ या पोस्टमध्ये लिहीतो की, "माझ्या आजपर्यंतच्या आयुष्यातला सर्वात सुंदर फोटो...मी आणि माझं "बालपण" .. आम्ही एकमेकांच्या बाजूला बसलो होतो.. पण.. बोललो काहीच नाही.. फक्त  अनुभवलं .. एकमेकांना.....तेजस नेरुरकर  मित्रा मी तुझा मनापासून आभारी आहे. तेजस नेरुरकर आज माझ्या सिध्दूला तू मला भेटवलस...आई, पप्पा, दादा , पिंकी.. लव्ह यू... खुप..."

सिद्धार्थच्या चाहत्यांनाही त्याचा हा फोटो प्रचंड आवडला आहे. या फोटोवर लाईक्सचा वर्षाव झालेला पाहायला मिळतोय. 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive