By  
on  

पाहा Video : साडीत खुललं रिंकू राजगुरुचं सौंदर्य, केला हा व्हिडीओ

सैराट फेम रिंकू राजगुरुने आता मनोरंजन विश्वात तिची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. यातच रिंकू सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. रिंकू तिचे विविध फोटो आणि व्हिडीओ सोशल मिडीयावर पोस्ट करते. खासकरुन रिंकूचे सोशल मिडीयावर व्हिडीओ हे लक्षवेधी ठरतात.

रिंकूने नुकताच एक खास व्हिडीओ सोशल मिडीयावर शेयर केला आहे. या व्हिडीओत रिंकूने साडी नेसली आहे. कुछ तो है तुझसे राबता या गाण्यावर रिंकूने हा व्हिडीओ केला आहे. या व्हिडीओत रिंकूचे निखळ हास्यही पाहायला मिळतय. चाहत्यांनीही रिंकूच्या या व्हिडीओला पसंती दिली आहे.

 

सैराट या सिनेमानंतर रिंकू 'कागर', 'मेकअप' या मराठी सिनेमांमध्ये झळकली होती. तर 'हंड्रेड' या वेबसिरीजमधून रिंकूने डिजीटल प्लॅटफॉर्मवर एन्ट्री घेतली होती. याशिवाय लवकरच 'छुमंतर' या द्विभाषिक सिनेमातून रिंकू प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive