By  
on  

पाहा Video : स्वप्निल जोशीच्या या वेबसिरीजला पूर्ण झालं एक वर्ष, लवकरच येणार दुसरं सिझन

 'समांतर' या वेबसिरीजमधून अभिनेता स्वप्निल जोशीने ओटीटीवर पदार्पण केलं होतं. याच वेबसिरीजला नुकतच एक वर्ष पूर्ण झालं आहे. यानिमित्ताने अभिनेता स्वप्निल जोशीने केक कापून याचं सेलिब्रेशन केलं. मागील वर्षी ही वेबसिरीज प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. आणि आता लवकरच या सिरीजचं दुसर सिझनही प्रदर्शित होणार आहे. नुकतच दुसऱ्या सिझनचं चित्रीकरणही पूर्ण झालं आहे.

या वेबसिरीजला एक वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने यावेळी केक कापण्यात आला. सोशल मिडीयाव स्वप्निलने हा व्हिडीओ शेयर केला आहे. याशिवाय आणखी एक पोस्ट केली आहे. या पोस्टमधून स्वप्निलने काही भावना व्यक्त केल्या आणि चाहत्यांचे, प्रेक्षकांचे आभार मानले आहेत.

स्वप्निल या पोस्टमध्ये लिहीतो की, "लोकांच्या मनात स्थान मिळवलेली वेब मालिका म्हणजे समांतर १ ! कथा , पटकथा , लेखन , संवाद सादरीकरण आणि दिग्दर्शन व निर्मिती यांचा उत्तम योग साधत ही वेब सिरीज अगदी अल्प कालावधीत तुमच्या पसंतीस पडली. एक एक रहस्य उलगडत त्यातली गूढ गोष्ट तुमच्या पर्यंत पोहचवण्यासाठी आम्ही केलेला हा एक प्रयत्न होता. " दर्जेदार कथा , उत्तम दिग्दर्शक , निर्माते , कलाकार , टेक्निकल टीम, गुढ आणि तितकाच अफलातून सेटअप असलेल्या " समांतर १ " ला आज वर्ष पूर्ण होतंय. मराठी वेब दुनियेत प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करणारी वेब सिरीज म्हणून आज समांतर ओळखली जाते. अनेक कमालीच्या लोकांच्या प्रयत्नामधून ही वेब मालिका आम्ही गेल्या वर्षी तुमच्या साठी घेऊन आलो आणि तुम्ही तिच्यावर जे भरभरून प्रेम केलंय हे आज शब्दात मांडणं थोड कठीण आहे. समांतर १ च्या अभूतपूर्व यशानंतर आम्ही लवकरच समांतर २ घेऊन येत आहोत. समांतर २ बद्दल तुम्हाला जेवढी उत्सुकता आहे तेवढीच उत्सुकता आम्हाला देखील आहे म्हणून आज समांतर १ च्या वर्ष पूर्ती निमित्ताने आम्ही सगळ्यांचे आभार मानत आहोत. तुमचं प्रेम तुमचा पाठींबा कायम राहू देत. समांतर १ च्या संपूर्ण टीम चे आभार. स्वर्गीय सुहास शिरवळकर , शिरवळकर ताई , कार्तिक - अर्जुन , जीसिम प्रोडक्शन , दिग्दर्शक सतीश राजवाडे , लेखक अंबर हडप , तेजस्विनी पंडित , गणेश रेवडेकर , नितीश भारद्वाज ही कलाकार मंडळी , mx प्लेअर सारखा आघाडीचा डिजिटल पार्टनर यांनी आम्हाला ही संधी दिल्या बद्दल त्यांचे खास आभार. तुमचं हे प्रेम कायम असू देत. मराठी प्रेक्षकांच्या सोबतीने बहुभाषिक प्रेक्षकांनी देखील समांतर १ वर तितकच भरभरून प्रेम आणि कमालीचा प्रतिसाद दिला आहे तुम्हा सगळ्यांचे मनापासुन आभार !"

तेव्हा 'समांतर'च्या दुसऱ्या सिझनची उत्सुकता प्रेक्षकांना असणार यात शंका नाही. 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive