By  
on  

पाहा Photos : रिंकू राजगुरुच्या साडी लुकने चाहत्यांना केलं घायाळ

अभिनेत्री रिंकू राजगुरु सध्या सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात सक्रिय झालेली पाहायला मिळतेय. विशेष म्हणजे सध्या सोशल मिडीयावर रिंकूचं साडी प्रेम पाहायला मिळतय. दररोज रिंकूच्या विविध पोस्ट पाहायला मिळतात. या पोस्टमध्ये विविध साडी लुक रिंकू पोस्ट करते.

नुकतच रिंकूने आणखी काही साडीतील सुंदर लुक पोस्ट केले आहेत. या साडी लुकमध्ये रिंकू सुंदर दिसतेय. रिंकूचे चाहतेही तिचे हे लुक्स मोठ्या प्रमाणात पसंत करतात. या फोटोंवर लाईक्सचा वर्षाव झालेला पाहायला मिळतोय. रिंकूच्या इन्स्टाग्राम प्रोफाईलवर पाहिल्यास विविध प्रकारच्या साड्या तिने परिधान केलेल्या पाहायला मिळतात. म्हणजेच रिंकूला साडी प्रचंड आवडते हे यातून दिसतय.

साडीच नाही तर विविध प्रकारच्या पारंपारिक आणि वेस्टर्न पेहरावातील फोटोही रिंकूने शेयर केले आहेत. प्रत्येक लुकमध्ये रिंकूचा हटके अंदाज पाहायला मिळतो. तर कधी वर्कआउटनंतरचे फोटोही रिंकू शेयर करते. मुख्य म्हणजे रिंकू ही बहुदा मेकअप शिवाय असलेले फोटो पोस्ट करताना दिसते. रिंकूच्या दररोजच्या पोस्ट चाहत्यांसाठी मात्र पर्वणीच असते.

लवकरच रिंकू 'छुमंतर' या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive