अभिनेता संग्राम समेळ नुकताच लग्नबंधनात अडकला आहे. संग्रामचं हे दुसरं लग्न असल्याने त्याच्या लग्नाची बरीच चर्चा झाली. नुकतीच संग्रामने श्रद्धा फाटकसोबत लगीनगाठ बांधली. श्रद्धाही नृत्यदिग्दर्शिका असून तिला नृत्याची आवड आहे.
सोशल मिडीयावर या नवविवाहीत जोडप्याची प्रचंड चर्चा आहे. अनेकांनी त्यांना लग्नासाठी शुभेच्छाही दिल्या आहेत. यातच आता संग्रामने एक फोटो पोस्ट केला आहे. श्रद्धासोबतचा लग्नाचा फोटो संग्रामने पोस्ट केला आहे. या पोस्टच्या कॅप्शनमध्ये संग्राम लिहीतो की, "नवी सुरुवात". श्रद्धासोबत लग्न करून संग्रामने आयुष्याची नवी सुरुवात केल्याचं या पोस्टमध्ये पाहायला मिळतय.
याआधी संग्रामचं लग्न अभिनेत्री पल्लवी पाटीलसोबत झालं होतं. 2016 मध्ये पल्लवी आणि संग्रामने लग्न केलं होतं. मात्र वेगळे झाल्यानंतर संग्रामने श्रद्धासोबत दुसरं लग्न केलं आहे.