By  
on  

पाहा Video : 'सैराट'च्या परश्याने असा चित्रीत केला होता या वेबसिरीजचा वॉर सीन

'1962 द वॉर इन द हिल्स' या वेबसिरीजमध्ये अभिनेता आकाश ठोसर झळकतोय. सैराटचा परश्या म्हणून ओळख असलेल्या आकाशने आता विविध प्रोजेक्टमधून त्याचं टॅलेंट प्रेक्षकांसमोर आणलय. या सिरीजमधून तो वेगळ्या भूमिकेत प्रेक्षकांसमोर आला आहे. या वेबसिरीजमध्ये आकाश एका सैनिकाच्या भूमिकेत आहे.

आकाश सोशल मिडीयावरही मोठ्या प्रमाणात सक्रिय असतो. त्याचे विविध अपडेट तो सोशल मिडीयावर पोस्ट करतो. नुकतच आकाशने एक व्हिडीओ शेयर केला आहे. '1962 द वॉर इन द हिल्स' याच वेबसिरीजचा हा बिहाइंड द सीन व्हिडीओ आहे. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Akash Thosar (@akashthosar)

 

या वॉर सीन दरम्यान आकाशने कशी एक्शन केली हे या व्हिडीओत पाहायला मिळतय. या वेबसिरीजमध्ये अभिनेता अभय देओल मुख्य भूमिकेत आहे. याशिवाय अनेक मराठी कलाकार या वेबसिरीजमध्ये झळकत आहेत. 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive