By  
on  

या कारणासाठी अद्वैत दादरकरने मानले मालिकेच्या टीमचे आभार

'अग्गंबाई सासूबाई'नंतर आता 'अग्गंबाई सूनबाई' ही नवी मालिका पाहायला मिळतेय. नुकतीच ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. या मालिकेत अभिनेता अद्वैत दादरकरचीही महत्त्वाची भूमिका आहे. पतिच्या भूमिकेत तो मालिकेत पाहायला मिळतोय. यात त्याचा लुक काहीसा हटके आहे. या मालिकेच्या निमित्ताने अद्वैतने संपूर्ण टीमचे आभार मानले आहेत. 

अद्वैतने सोशल मिडीयावर नुकतीच एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्याचा मालिकेतील हटके लुक पाहायला मिळतोय. 

या पोस्टमध्ये तो लिहीतो की, "धन्यवाद झी मराठी, सोजल, रेणुका, सिद्धार्थ, निलेश सर, सौमील क्रिेएशन्स मला ही संधी दिल्याबद्दल. धन्यवाद क्रिएटीव्ह टीम माझ्यावर विश्वास ठेवण्यासाठी. दोन्ही लूक साकारणारे कॉश्मु डिझायनर, मेकअप आर्टिस्ट, अभय दादा. सगळ्यांनीच खूप मेहनत घेतली आहे. ज्यांच्या बरोबर काम करण्याची इच्छा होती आणि अर्थात खूप शिकायला मिळणार आहे असे मोहन जोशी सर.आणि जिला मी ऑलरेडी त्रास द्यायला सुरुवात केली आहे ती उमा, भक्ती रत्नपारखी, गितांजली धमाल करू.."

 

यासोबतच गोलमाल, डबल रोल असे हॅशटॅग त्याने दिले आहे.  तेव्हा सोहमच्या भूमिकेत अद्वैत प्रेक्षकांची मनं जिंकणार यात शंका नाही. 'माझ्या नवऱ्याची बायको' या मालिकेत अद्वैतने साकारलेला सौमित्र सगळ्यांनाच आवडला होता. आता या भूमिकेतून अद्वैत प्रेक्षकांचं कसं मनोरंजन करतोय हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive