अनेकांच्या काहीना काही बकेट लिस्ट असतात. जेव्हा त्या बकेट लिस्टमधील स्वप्न पूर्ण होतं तेव्हाची भावना काही वेगळीच असते. असच झालय अभिनेता सिद्धार्थ जाधवच्या बाबतीत. नुकतच सिद्धार्थचं त्याच्या बकेट लिस्टमधील एक स्वप्न पूर्ण झालय. ते स्वप्न म्हणजे मराठी फिल्मफेअरचं होस्टिंग. नुकताच मराठी फिल्मफेअरचा सोहळा पार पडला. यावेळी अभिनेता सिद्धार्थ जाधवने को-होस्ट अमेय वाघसोबत या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन केलं.
यावेळचा अनुभव सिद्धार्थने एका पोस्टद्वारे शेयर केला आहे. या सोहळ्या दरम्यानचा बिहाइंड द सीन्स व्हिडीओ त्याने शेयर केला आहे. यासाठी तयार होण्यापासून मंचावर सूत्रसंचालन करेपर्यंतचा प्रवास पाहायला मिळतोय. सिद्धार्थसाठी हा अनुभव अविस्मरणीय होता. हा अनुभव त्याने या व्हिडीओ आणि पोस्टमधून शेयर केला आहे.
सिद्धार्थ या पोस्टमध्ये लिहीतो की, "फिल्मफेअर होस्टिंग केल्यानंतर आपण कौतुकाचा वर्षाव केला.. त्याबद्दल मायबाप रसिक प्रेक्षकांचे मनःपूर्वक आभार..खरंच खूप स्पेशल फिलिंग होती माझ्यासाठी.. फिल्मफेअर, कलर्स मराठी, प्लॅनेट मराठी, मानसी इंगळे आणि अर्थात माझ्या भावासारखा अमेय वाघ यांनी माझ्यावर विश्वास ठेवला आणि मला ही भूमिका पार पाडण्यासाठी मोलाचं सहकार्य केलं..त्या बद्दल सगळ्यांचे मनःपूर्वक आभार..आणि माझी टीम. लव्ह यू यारो...बकेट लिस्ट मधील अजून एक स्वप्न पूर्ण झालं याचा खुप आनंद आहे..."
हा आनंद सिद्धार्थने या व्हिडीओद्वारे शेयर केला आहे.