By  
on  

पाहा Photo : प्राजक्ता माळीने शेयर केला या खास व्यक्तिसोबतचे फोटो, फोटोंवर लाईक्सचा वर्षाव

अभिनेत्री प्राजक्ता माळी सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. प्राजक्ताचे विविध फोटो आणि व्हिडीओ तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर पाहायला मिळतात. प्राजक्ताने नुकतेच काही खास फोटो सोशल मिडीयावर शेयर केले आहेत. या फोटोत प्राजक्तासोबत आहे एक खास व्यक्ति. ही व्यक्ति आहे प्रसिद्ध फोटोग्राफर तेजस नेरुरकर. 

तेजस अनेक सेलिब्रिटींचे जबरदस्त फोटो क्लिक करतो. एक उत्तम आणि प्रसिद्ध फोटोग्राफर म्हणून त्याची ओळख आहे. प्राजक्तासोबतचे त्याचे हे गमतीशीर फोटो चर्चेत आले आहेत.

प्राजक्ता या फोटोंच्या पोस्टमध्ये लिहीते की, "त्याची आवडती पोझ आणि माझं आवडतं एक्सप्रेशन, आज ट्विनींग करतोय. आम्ही एकत्र शूट करताना नेहमीच मजा करतो. असं नेहमीच नाही लिहीणार. पण होय नेहमीच तू काढलेल्या फोटोंमध्ये स्वत:ला पाहणं आनंददायी असतं.'
तेव्हा नुकतच तेजस नेरुरकरने प्राजक्ताचं फोटोशूट केलं असल्याचं पाहायला मिळतय. या फोटोंप्रमाणे तेजसने क्लिक केलेले प्राजक्ताचे फोटोही सुंदर असणार यात शंका नाही.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive