By  
on  

पाहा Video : क्रिकेट सामन्यादरम्यान पाहायला मिळाली माधव आणि आकाशची अतरंगी यारी

नुकताच रायपुरमध्ये टी 20 क्रिकेट सामना रंगला. हा क्रिकेट सामना पाहण्यासाठी अनेक क्रिकेटप्रेमी पोहोचले होते. यावेळी काही मनोरंजन विश्वातील कलाकारही उपस्थित होते. अभिनेता माधव देवचके, आकाश ठोसर, शीव ठाकरे हे सेलिब्रिटी हा क्रिकेट सामना पाहण्यासाठी पोहोचले होते. 

यावेळी माधव आणि आकाशची फ्रेंडशीप आणि मस्ती पाहायला मिळाली. माधवने यावेळची काही क्षणचित्रे सोशल मिडीयावर शेयर केली आहेत. क्रिकेट हा सगळ्यांचाच जिव्हाळ्याचा विषय. तेव्हा या कलाकारांनीही या सामन्या दरम्यान सामन्याचा आनंद लुटत या विषयावर निवांत गप्पा मारल्या असतील हे पाहायला मिळतय.

दोघांनी या सामन्याचा मनमुराद आनंद लुटला असल्याचं या फोटोंमधून पाहायला मिळतय. या पोस्टमध्ये माधव लिहीतो की, "अपनी तो यारी अतरंगी है रे"

सोशल मिडीयावर या फोटोंना पसंत केलं जात आहे. 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive