'तुझ्यात जीव रंगला': राणादाचा जिगरी दोस्त बरकत अडकला विवाहबंधनात

By  
on  

कोल्हापुरचा रांगडा गडी आणि कुस्तीच्या आखाड्यात भल्याभल्यांना धूळ चारणारा राणा दा आणि त्याचा जिगरी दोस्त बरकत यांच्या दोस्तीचे किस्से तुम्हाला काही वेगळे सांगायला नकोत. राणा दाच्या प्रत्येक सुख दुख:च्या प्रसंगात त्याला नेहमी योग्य वाट दाखवणारा आणि त्याला नेहमीच समजून घेणारा बरकत म्हणजेच अभिनेता अमोल नाईक नुकताच ख-या आयुष्यात विवाहबंधनात अडकला आहे.

अभिनेता अमोल नाईक म्हणजेच सर्वांचा लाडका बरकत याच्या लग्नाला संपूर्ण तुझ्यात जीव रंगलाचा परिवार उपस्थित होता. अंजलीबाई म्हणजेच अभिनेत्री अक्षया देवधर, राणा दा अभिनेता हार्दिक जोशी यांची अमोलच्या लग्नाला खास उपस्थिती होती. ऑफस्क्रीनही या तिघांची केमिस्ट्री यावेळी दिसून आली. अमोल हा पूजा हिच्यासोबत विवाहबध्द झाला. तसंच 'तुझ्यात जीव रंगला मालिकेतील संपूर्ण कलाकार अमोल शुभेच्छा देण्यासाठी आवर्जून हजर होते.

https://www.instagram.com/p/BwWanL_n2rY/

अभिनेता अमोल नाईक यांस पिपींगमून मराठीतर्फे खुप खुप शुभेच्छा...नांदा सौख्य भरे!

https://www.instagram.com/p/BwWcNL5nOV7/

 

 

 

Recommended

Loading...
Share