By  
on  

अभिनेत्री भाग्यश्री लिमयेने सोशल मिडियावरून चाहत्यांना केलं हे आवाहन

‘घाडगे आणि सून’ या मालिकेतून रसिकांच्या भेटीला आलेली गोंडस चेह-याची अभिनेत्री म्हणजे भाग्यश्री लिमये. या मालिकेतील अमृताची व्यक्तिरेखा साकारत असलेल्या भाग्यश्रीने अल्पावधीतच रसिकांच्या मनात स्थान मिळवलं आहे. भाग्यश्री आणि चिन्मयच्या जोडीला प्रेक्षकांनीही पसंतीची पावती दिली आहे. भाग्यश्री सोशल मिडियावरही ब-यापैकी अ‍ॅक्टीव्ह असते. तिने नुकताच एक व्हिडियो शेअर केला आहे.

https://www.instagram.com/p/BwY4CmLBaWr/?utm_source=ig_web_copy_link

या व्हिडियोमध्ये तिने पक्ष्यांसाठी पिण्याचं पाणी घराच्या छतावर ठेवण्याचं आवाहन केलं आहे. उन्हाळ्यात पक्षांसाठी पाण्याचा तुटवडा निर्माण होतो. छतावर पाणी ठेवल्याने पक्ष्यांना ते सहज उपलब्ध होते. त्यामुळे भाग्यश्रीने चाहत्यांनाही पक्षांसाठी पाणी ठेवण्याचं आवाहन केलं आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive