By  
on  

पाहा Video : या अभिनेत्रीसोबत शिव ठाकरेचा रोमान्स, रोमँटिक अंदाजात दिसले दोघं

मराठी बिग बॉसच्या दुसऱ्या सिझनचा विजेता शिव ठाकरे सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असतो. नुकताच शिवचा एक व्हिडीओ चर्चेत आला आहे. या रोमंँटिक व्हिडीओने सगळ्यांचं लक्ष वेधलं आहे. या व्हिडीओत शिव एका अभिनेत्रीसोबत रोमँटिक अंदाजात दिसतोय. ही अभिनेत्री आहे डान्सिंग क्वीन फेम आयुषी भावे.

या व्हिडीओत शिव आणि आयुषी रोमँटिक डान्स करताना दिसत आहेत. अनेकांना हा व्हिडीओ पाहुन प्रश्न पडला असेल की नेमकी ही जोडी रोमान्स करताना कशी दिसतेय ? तर याचं कारणही आम्ही तुम्हाला सांगतो. 

 

नुकत्याच एका पुरस्कार सोहळ्यासाठी शिव आणि आयुषीने परफॉर्म केलं आहे. आणि याचदरम्यान दोघांनी ऑफस्क्रिन हा व्हिडीओ केला आहे. या व्हिडीओत दोघांचा रोमँटिक अंदाज तर दिसतोय पण त्यासोबत दोघांची जबरदस्त केमिस्ट्री सगळ्यांचं लक्ष वेधतेय. शाहरुख - करिनाच्या 'अशोका' सिनेमातील 'सन सनन' या गाण्यावर हा व्हिडीओ करण्यात आलाय. त्यामुळे आगामी काळात या जोडीला एकत्र पाहायला प्रेक्षकांना आवडेल एवढं नक्की. 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive