By  
on  

पाहा Video : गाडीत उभं राहुन शनायाने केला हा व्हिडीओ, भावासोबतची आठवण केली शेयर

'माझ्या नवऱ्याची बायको' या मालिकेतून प्रसिद्ध झालेली शनाया म्हणजेच अभिनेत्री रसिका सुनील सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. सोशल मिडीयावरही तिचा मोठा चाहतावर्ग आहे. रसिका तिचे विविध व्हिडीओ आणि फोटो सोशल मिडीयावर पोस्ट करते. 

रसिकाने नुकताच एक व्हिडीओ सोशल मिडीयावर पोस्ट केला आहे. या व्हिडीओत रसिका चालु गाडीत उभी राहुन व्हिडीओ करताना दिसतेय. कन्हरटीबल म्हणजे छप्पर नसलेली ही कार आहे. या गाडीत रसिकाने सेल्फि व्हिडीओ केला आहे. लास वेगासच्या ट्रीपचा हा जुना व्हिडीओ रसिकाने आठवणीत शेयर केला आहे. या व्हिडीओत रसिकाचा छोटा भाऊ कार ड्राईव्ह करतोय. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Rasika Sunil (@rasika123s)

 

या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये रसिका लिहीते की, "जेव्हा आम्ही वेगासला रोड ट्रीपसाठी गेलो होतो. मी आणि माझा छोटा भाऊ." लास वेगासमधील रसिका तिच्या भावासोबत गेलेल्या रोड ट्रीपचा हा व्हिडीओ आहे.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive