पाहा Video : अवॉर्ड सोहळ्याच्या रेडकार्पेटवर रुपाली भोसलेचा स्टनिंग लुक, बॉयफ्रेंडसोबत लावली हजेरी

By  
on  

अभिनेत्री रुपाली भोसलेने नुकतीच मिर्ची म्युझिक अवॉर्ड सोहळ्याला हजेरी लावली होती. यावेळी रुपालीच्या सुंदर आउटफिटने सगळ्यांचं लक्ष वेधलं. जांभळ्या रंगाच्या लाँग गाउनमध्ये रुपालीने हजेरी लावली होती. या गाउनमध्ये रुपालीचा स्टनिंग लुक पाहायला मिळाला. 

यावेळचा रेड कार्पेटवरील लुकचा व्हिडीओ रुपालीने सोशल मिडीयावर पोस्ट केला आहे. 

 

यावेळी रुपालीने तिचा बॉयफ्रेंड अंकित मगरेसोबत हजेरी लावली होती. रुपालीने सोशल मिडीयावर बॉयफ्रेंडसोबतचा फोटोही शेयर केला आहे. सध्या रुपाली 'आई कुठे काय करते' या मालिकेत संजनाची भूमिका साकारत आहे. मराठी बिग बॉसच्या दुसऱ्या पर्वातही रुपाली स्पर्धक म्हणून दिसली होती. 

 

Recommended

Loading...
Share