By  
on  

पाहा Video : प्रार्थना बेहेरेने भिंतीवर केलं सुंदर रंगकाम

अभिनेत्री प्रार्थना बेहेरे ही चित्रकला आणि रंगकामात असलेल्या कौशल्याचा वापर विविध ठिकाणी करताना दिसते. स्वत:च्या घराची सजावट करणं, पेंटिंग करणं प्रार्थनाला प्रचंड आवडतं. सोशल मिडीयावर प्रार्थनाची ही कला अनेकदा पाहायला मिळते. 

नुकतच प्रार्थनाने एक व्हिडीओ शेयर केला आहे. या व्हिडीओत प्रार्थना भिंत रंगवताना दिसत आहे. प्रार्थनाने चक्क घराच्या भिंतीवर सुंदर चित्र काढलं आहे. सुंदर फुलाचं हे चित्र रंगवतानाचा हा व्हिडीओ आहे.

 

शिवाय हे चित्र पूर्ण झाल्यावर प्रार्थनाने फोटोही शेयर केले आहेत. प्रार्थना तिची ही कला विविध पद्धतिने जोपासताना दिसते. कधी भिंत रंगवणे, शूज रंगवणे तर कधी दिवे रंगवणे, मातीकाम, पेंटिंग या आणि इतर बऱ्याच क्रिएटिव्ह गोष्टी प्रार्थना करते. 

 

अभिनय क्षेत्रात काम करत असताना प्रार्थना तिच्या या कलेपासून दूर झालेली नाही. निवांत वेळेत प्रार्थना तिची रंगकामाची ही कला जोपासताना दिसते.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive