By  
on  

पाहा Photo : "ती आम्हाला सोडून जाणार ही गोष्ट अजुन आम्हाला पचली नव्हती" म्हणत अमेय वाघने शेयर केली ही पोस्ट

अभिनेता अमेय वाघ सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असतो. सोशल मिडीयावर त्याने असंख्य चाहते आहेत. त्याच्या प्रोजेक्टविषयीची माहिती किंवा त्याच्या आयुष्यातील विविध गोष्टी तो या माध्यमातून चाहत्यांसोबत शेयर करतो. नुकतीच अमेयने त्याच्या आयुष्यातील एक खास गोष्ट शेयर केली आहे.

अमेयने इन्स्टाग्रामवर एक फोटो शेयर केला आहे. हा फोटो आहे अमेया वाघच्या बहिणीच्या लग्नाचा. या फोटोत अमेय आणि त्याच्या पत्नीसोबत त्याचा परिवार पाहायला मिळतोय. मल्लू पद्धतिने हे लग्न करण्यात आलं. त्यामुळे या सगळ्यांचा पेहरावरही तसाच साउथ स्टाईल पाहायला मिळतोय. अमेयही या हटके पेहरावात दिसतोय. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by amey wagh (@ameyzone)

 

या फोटोच्या कॅप्शनमध्ये अमेय लिहीतो की, "हा तो क्षण आहे जेव्हा आमच्या कुटुंबातल्या सगळ्यात लाडक्या पोरीचं लग्न लागलं आणि आता ती आम्हाला सोडून जाणार ही गोष्ट अजुन आम्हाला पचली नव्हती! "या पोस्टमधून अमेयने बहिणीच्या लग्नातला हा खास क्षण सगळ्यांसोबत शेयर केला आहे.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive