By  
on  

पाहा Video : आशा भोसले यांना 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कार, नातीसोबत असं केलं सेलिब्रेशन

ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना नुकताच महाराष्ट्र भूषण पुरस्कार घोषित झाला आहे. राज्य सरकारने नुकताच हा पुरस्कार जाहीर केला आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सोशल मिडीयावरुन एक पोस्ट करण्यात आली. त्यात लिहीलय की, "ख्यातनाम गायिका आशा भोसले जी यांना २०२० सालचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या अध्यक्षतेखालील महाराष्ट्र भूषण पुरस्कार निवड समितीच्या बैठकीत हा निर्णय झाला. निवडीनंतर मुख्यमंत्र्यांनी आशाताईंचे अभिनंदन केले."

आशाताईंची नात झनाईला ही बातमी कळताच तिने आशाताईंसाठी खास सेलिब्रेशन केलं आहे. आशा भोसले यांच्या सोशल मिडीया अकाउंटवर एक व्हिडीओ शेयर करण्यात आला आहे. या व्हिडीओत सेलिब्रिशनसाठी केक आणि मिठाई ठेवण्यात आली आहे. नात झनाई आशाताईंना विचारते की हा पुरस्कार जाहीर झाल्यावर कसं वाटतय ? तेव्हा आशाताई म्हणतात की, "मला खूप छान वाटतय. कारण मला आत्तापर्यंत बरेच अवॉर्ड मिळाले आहेत. हा पुरस्कार जणू माहेरचा आहे. हा मला माझ्या आईकडून मिळालेला अवॉर्ड आहे.  मला खूप आनंद वाटतोय. मी महाराष्ट्र सरकारची खूप आभारी आहे की त्यांनी मला हा पुरस्कार दिला आहे. जय हिंद जय महाराष्ट्र."

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Asha Bhosle (@asha.bhosle)

 

आशाताईंनी आत्तापर्यंत 16 हजाराहून अधिक गाणी गायली आहेत. हिंदी, मराठीसह त्यांनी अनेका भाषांमध्ये असंख्य गाणी गायली आहेत. आत्तापर्यंत विविध पुरस्कार मिळालेल्या आशाताईंना आता 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कार जाहीर झाल्यानंतर त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive