By  
on  

दिग्दर्शक आणि फॅशन डिझायनर विक्रम फडणीस यांना कोरोनाची लागण

सध्या कोरोनाचा प्रार्दुभाव वाढताना दिसतोय. कोरोनाची दुसरी लाट आल्यानं कोरोनाचा संसर्ग वाढतोय. एकीकडे मनोरंजन विश्वाचं काम सुरळीत सुरु झालं असताना अनेक कलाकारांना कोरोनाची लागण होत आहे. अभिनेता आमिर खान, आर माधवन, मिलिंद सोमण या कालाकारांची कोरोना चाचणी पॉजिटिव आल्याचं समोर आलय. तर मराठी मनोरंजन विश्वातही अनेक कलाकारांची कोविड चाचणी पॉजिटिव आल्याचं दिसतय. अभिनेता उमेश कामत आणि प्रिया बापट यांनाही कोरोना झाल्याचं त्यांनी सोशल मिडीयावर पोस्ट केलं होतं. 

प्रसिद्ध फॅशन डिझायनर आणि दिग्दर्शक विक्रम फडणीसला कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. विक्रम यांची कोविड चाचणी पॉजिटिव आली आहे. नुकतच विक्रम फडणीसने सोशल मिडीयावर याची माहिती दिली आहे. विक्रम लिहीतात की, "मागील वर्षापासून बरीच काळजी घेऊन ही, मी सोशल डिस्टंसिंगचा पालन करतोय की नाही याची खात्री करुन घेत असताना आणि मास्क घालूनही माझी कोरोना चाचणी पॉजिटिव आली आहे. आपण सध्या परिक्षेच्या काळात जगत आहोत. कुणीच काहीही हलके घेऊ शकत नाही. मी स्वत:ला क्वारंटाईन केले आहे आणि सध्या आयसोलेशनमध्ये आहे. सुरक्षित राहा."

 

 तेव्हा विक्रम यांना कोरोनाची लागण झाल्यावर त्यांनी स्वत:ला क्वारंटाईन केले आहे. विक्रम यांनी 'ह्रदयांतर', 'स्माईल प्लिज' या मराठी चित्रपटांचं दिग्दर्शन केलं आहे. याशिवया फॅशन इंडस्ट्रित प्रसिद्ध फॅशन डिझायनर म्हणून त्यांची ओळख आहे. 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive