रिंकू राजगुरुचा नवा सिनेमा ‘कागर’ने रसिकांच्या मनाची उत्सुकता वाढवली आहे. आता या सिनेमातील नवीन गाणं रिलीज झालं आहे. ‘लई दिसानं आलाया हातामंदी चान्स आता होऊन जाऊ दे नागिन डान्स’ असे या नव्या गाण्याचे बोल आहेत. यात शुभंकर तावडे आणि शंतनू गणगणे हे दोघे दिसत आहेत. नेता बनलेल्या शंतनूसाठी असलेल्या पार्टीमध्ये हे सगळे बेभान होऊन नाचताना दिसत आहेत. आदर्श शिंदे आणि प्रवीण कुमार यांनी या गाण्यावर स्वरसाज चढवला आहे. संगीत ए व्ही प्रफुल्लचंद्र यांचं आहे. अस्सल ग्रामीण बाजाचा टच असलेलं गाणं प्रत्येकाला आवडेल यात शंका नाही. सुधीर कोलते आणि विकास हांडे यांच्या उदाहरणार्थ निर्मित आणि व्हायकॉम १८ स्टुडिओची निर्मिती असलेला हा सिनेमा मकरंद माने दिग्दर्शित करत आहेत. हा सिनेमा २६ एप्रिलला रसिकांच्या भेटीला येत आहे.
https://www.youtube.com/watch?v=nkI96dHT_yA