पाहा Photos : सेलिब्रिटींनी केलं धुलिवंदनाचं सेलिब्रेशन, विविध रंगात असे रंगले हे कलाकार

By  
on  

कोरोनाग्रस्त परिस्थितीत यंदा होळी, धुलिवंदनाचं सेलिब्रेशन मोठ्या प्रमाणात करता आलेलं नाही. असं असलं तरी काही सेलिब्रिटींनी आपल्या परिवारासोबत एकमेकांना रंग लावून छोटेखानी पद्धतिने होळी, धुलिवंदन साजरी केली आहे. 

नवविवाहीत जोडी मानसी नाईक आणि प्रदीप खरेरा यांनी होळीचं सेलिब्रेशन केलं आहे. सोशल मिडीयावर दोघांनी त्यांचे गोड फोटोदेखील शेयर केले आहेत. 

अभिनेता अभिजीत खांडकेकर आणि पत्नी सुखदा खांडकेकर यांनीही धुळवड साजरी केली आहे. यावेळी पांढऱ्या रंगाचे कपडे परिधान करून दोघांनी काही फोटो आणि व्हिडीओ सोशल मिडीयावर शेयर केले आहेत. 

नवविवाहीत जोडी सई लोकूर आणि तिर्थदीप रॉय यांनीही होळी साजली केली आहे. सईने तिर्थदीपसोबतचा धुळवड सेलिब्रेशनचा सेल्फि फोटो शेयर केला आहे.

मराठी बिग बॉसच्या दुसऱ्या पर्वाचा विजेता शिव ठाकरेनेही होळीच्या निमित्ताने खास फोटो शेयर करत चाहत्यांना शुभेच्छा देत हा सण साजरा केला. 

बऱ्याच नवविवाहीत सेलिब्रिटी कपलसाठी यंदा ही लग्नानंतरची पहिलीच होळी आहे. तेव्हा त्यांनीही लग्नानंतरच्या पहिल्या होळी सणाचा आनंद लुटला आहे. अभिनेता सिद्धार्थ चांदेकर आणि अभिनेत्री मिताली मयेकर यांनीही धुळवड साजरी केली. मितालीने सोशल मिडीयावर दोघांच्या रंगलेल्या चेहऱ्यांचे गोड फोटो शेयर केले आहेत.

काही दिवसांपूर्वी नंदिता वहिनी म्हणून प्रसिद्ध असलेली अभिनेत्री धनश्री काडगांवकरने गोंडस मुलाला जन्म दिला. यंदाची होळी तिने पति आणि बाळासोबत साजरी केली आहे.

धकधक गर्ल माधुरी दीक्षितने होळीचा थ्रोबॅक फोटो शेयर केला आहे. पतिसोबतचा हा फोटो शेयर करत माधुरीने होळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

यंदा होळी आणि धुळवडीच्या या सणाला सोशल मिडीयावर एका व्हिडीओने सगळ्यांचं लक्ष वेधलं. सोशल मिडीयावर ज्या कपलचे व्हिडीओ चर्चेत असतात ते कपल म्हणजे रितेश आणि जेनेलिया देशमुख ही जोडी. या दोघांचे विविध मजेशीर व्हिडीओ पाहायला मिळतात. होळीच्या निमित्तानेही दोघांनी खास व्हिडीओ शेयर करत होळी साजरी केली आहे. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Genelia Deshmukh (@geneliad)

तर रितेश - जेनेलियाने दोन्ही मुलांसोबतचा एक गोंडस व्हिडीओही शेयर केला आहे.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Riteish Deshmukh (@riteishd)

 

यासह अनेक सेलिब्रिटींनी साध्या पद्धतिने होळी आणि धुळवडीचा सण साजरा करत आपल्या प्रियजनांसोबत सध्याच्या नियमांचं पालन करून या सणाचा आनंद लुटला आहे. 

Recommended

Loading...
Share