By  
on  

पहिल्यांदाच रुपेरी पडद्यावर दिसणार ही प्रेमकहाणी, 'रावरंभा' चित्रपटाची घोषणा

सध्या मराठीत अनेक ऐतिहासिक चित्रपटांची घोषणा होत आहे. यातच आणखी एका मराठी चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. 'रावरंभा' असं या चित्रपटाचं नाव असून या चित्रपटाचा टीझर पोस्टर प्रदर्शित करण्यात आला आहे. अनुप अशोक जगदाळे दिग्दर्शित 'रावरंभा' हा चित्रपट त्या सर्व ऐतिहासिक चित्रपटांमध्ये वेगळा ठरणार असल्याचं म्हटलं जातय.या चित्रपटातून एक ऐतिहासिक प्रेमकहाणी उलगडणार आहे. विशेष म्हणजे मोठी ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या राजधानी सातारा जिल्ह्यात निर्मिती होणारा हा पहिलाच ऐतिहासिक चित्रपट ठरणार आहे. 

शशिकांत पवार प्रॉडक्शन्सचे  श्री शशिकांत शीला भाऊसाहेब पवार हे "रावरंभा" - द ग्रेट वॉरियर ऑफ १६७४. या चित्रपटाची निर्मिती करत आहेत. 'बेभान', 'झाला बोभाटा', 'भिरकीट', 'करंट' असे उत्तम चित्रपट केलेले अनुप अशोक जगदाळे या चित्रपटाचं दिग्दर्शन करत आहेत. ऐतिहासिक कथानक मांडण्यात हातखंडा असलेल्या प्रताप गंगावणे यांनी याचं लेखन केलं आहे. लवकरच या चित्रपटाचं चित्रीकरण सुरु होणार आहे. मात्र या चित्रपटात कोण कलाकार झळकणार हे अद्याप गुलदस्त्यातच आहे.

इतिहासाच्या सोनेरी पानांमध्ये 'रावरंभा' ही सह्याद्रीच्या कड्याकपाऱ्यांतील एक अनोखी प्रेमकहाणीही दडली आहे. ही प्रेमकहाणीच 'रावरंभा' या चित्रपटातून पहिल्यांदा रुपेरी पडद्यावर येत आहे.  छत्रपती शिवाजी महाराजांच्या पार्श्वभूमीवर उभा असलेला मावळा या पोस्टरवर दिसत आहे.. त्यामुळे आकर्षक नाव आणि लक्षवेधी पोस्टर यामुळे या चित्रपटाविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive