By  
on  

सलील कुलकर्णी यांना कोरोनाची लागण, म्हटले "सर्वतोपरी काळजी घेऊनही कोविड टेस्ट पॉजिटिव आली"

सध्या कोरोनाग्रस्तांची संख्या वाढताना दिसत आहेत. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेसह कोरोनाचा फैलाव वाढताना दिसत आहे. यातच मनोरंजन विश्वातील अनेक कलाकारांना कोरोनाची लागण झाली आहे. बॉलिवुडसह काही मराठी कलाकारांची कोरोना चाचणी पॉजिटिव आली असून हे कलाकार या विषाणूच्या विळख्यात सापडले आहेत.

संगीतकार, गायक, लेखक सलील कुलकर्णी यांना देखील कोरोना झाल्याचं समोर आलं आहे. सलील यांनी सोशल मिडीयावर पोस्ट करून याविषयीची माहिती दिली आहे. सलील या पोस्टमध्ये लिहीतात की, "सर्वतोपरी काळजी घेऊनही आज माझी कोविड -19 टेस्ट पॉजिटिव आली आहे. घरीच आयसोलेट करून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ट्रीटमेंट सुरू केली आहे. गेल्या एका आठवड्यात जे जे भेटले त्यांना कल्पना असावी ह्या दृष्टीने हे ट्विट."

 

तेव्हा काळजी घेऊनही कोरोना झाल्याचं सलील या पोस्टमधून सांगतात. काही दिवसांपूर्वी अभिनेता उमेश कामत आणि प्रिया बापट यांनीही त्यांची कोरोना चाचणी पॉजिटिव आल्याचं सांगीतलं होतं.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive