By  
on  

पाहा Photos : सिद्धार्थ जाधवचा हटके स्वॅग, या लुकने वेधलं चाहत्यांचं लक्ष

सिनेमा, नाटक, मालिका, रिएलिटी शो या विविध माध्यमांमधून अभिनेता सिद्धार्थ जाधव प्रेक्षकांचं मनोरंजन करत असतो. मराठीसह हिंदी सिनेमांमधूनही त्याने प्रेक्षकांचं लक्ष वेधलं आहे. एवढच नाही तर सोशल मिडीयावरील त्याच्या पोस्टही सगळ्यांचं लक्ष वेधतात. 

गेल्या काही वर्षांपासून सिद्धार्थ त्याच्या स्टाईल आणि लुकमध्ये विविध प्रयोग करताना दिसतोय. सध्या त्याचे हटके आउटफीटमधील लुक चांगलेच चर्चेत असतात.

सिद्धार्थने सोशल मिडीयावर नुकतेच काही फोटो शेयर केले आहेत. या फोटोंमध्ये सिद्धार्थचा स्वॅग लुक पाहायला मिळतोय. जॅकेट, गॉगल, शूज, जीन्स यांचं धमाल कॉम्बिनेशन त्याने या फोटोंमध्ये केलं आहे. सोशल मिडीयावर सिद्धार्थचा मोठा चाहतावर्ग आहे. या चाहत्यांसाठी सिद्धार्थ विविध पोस्ट करताना दिसतो. या नव्या फोटोंवर त्याच्या चाहत्यांनी लाईक्सचा वर्षाव केला आहे.

मराठी सिनेमांमधून तर सिद्धार्थ कायम वैविध्यपूर्ण भूमिका करताना दिसला आहे. यासह हिंदी सिनेसृष्टीतही त्याने आपलं वेगळं स्थान निर्माण केलय. 'सिम्बा' या रणवीर सिंहच्या सिनेमातील त्याची भूमिका चांगलीच लक्षवेधी ठरली. तेव्हा आगामी काळात सिद्धार्थ प्रेक्षकांसाठी, त्याच्य चाहत्यांसाठी कोणत्या भूमिकेत येतोय हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. 

 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive