By  
on  

या अभिनेत्याने पत्नीच्या वाढदिवसाला केली खास पोस्ट, म्हणतो "माझ्यासाठी तू माझं विश्व आहेस"

अभिनेता अभिजीत खांडकेकर आणि सुखदा खांडकेकर ही अनेकांची आवडती जोडी आहे. हे रियल लाईफ कपल जणू काही कपल गोल्स देणारं आहे. सोशल मिडीयावरही हे कपल चर्चेत असतं. दोघही अभिनय क्षेत्रात काम करत असताना सोशल मिडीयावरील त्यांच्या पोस्ट लक्षवेधी ठरतात.

अभिजीतने नुकतच पत्नी अभिनेत्री सुखदासाठी एक खास पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये अभिजीतने सुखदासोबतचे फोटो शेयर केले आहे. हे गोड फोटो पोस्ट करण्याचं कारणही खास आहे.

सुखदाच्या वाढदिवसानिमित्ताने अभिजीतने ही खास पोस्ट करून तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. 

या पोस्टमध्ये अभिजीत लिहीतो की, "तू माझ्यासाठी माझं जग आहेस." ही पोस्ट पाहुन सुखदालाही आनंद झाला असेल यात शंका नाही. वाढदिवसानिमित्ताने सोशल मिडीयाच्या माध्यमातून सुखदावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive