सध्या कोरोनाची दुसरी लाट देशात आली आहे. त्यामुळे कोरोना वॅक्सिनेशनची लस येताच अनेक जण लसीकरण करत आहेत. यात मनोरंजन विश्वातील कलाकारही योग्य ती काळजी घेण्यासाठी लसीकरण करत आहेत. अभिनेता सुबोध भावेनेही नुकतीच कोरोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी लस घेतली आहे. यावेळी सुबोधने पत्नी मंजिरी सोबत ही लस घेतली. पण लस जरी घेतली असली तरी योग्य ती काळजी घेण्याचं आवाहन सुबोध इतरांना करत आहे.
सुबोधने सोशल मिडीयावर पोस्ट करून लस घेतल्याची माहिती दिली. मात्र या महत्त्वाची गोष्ट त्याने नमुद केली आहे. सुबोध म्हणतो की, "लस घेतली तरी काळजी घ्यायचीच आहे!"
तेव्हा लस जरी घेतली तरी या विषाणू पासून बचाव करण्यासाठी सतत काळजी घ्यावी लागणार असल्याचं सुबोध सांगत आहे. अनेक सेलिब्रिटी आता त्यांच्या लसीकरणाचे फोटो सोशल मिडीयावर शेयर करत आहेत.