By  
on  

दोस्तांची धम्माल ‘पार्टी’ हॅंगओव्हर घेऊन लवकरच येतेय प्रेक्षकांच्या भेटीला

दोस्तांची पार्टी म्हणजे खुप धम्माल असते. आपण सर्वच अशी पार्टी करण्यासाठी नेहमीच आतुर असतो. पार्टी म्हणजेच मस्ती आणि धिंगाणा.आपल्या रिअल लाईफ सारखीच रिल लाईफमध्ये अशीच दोस्तांच्या पार्टीची गोष्ट ‘पार्टी’ या सिनेमाद्वारे रुपेरी पडद्यावर झळकणार आहे.

https://www.youtube.com/watch?v=Yzoj4og-_Oo

सचिन दरेकर दिग्दर्शित 'पार्टी'  या सिनेमाचा पोस्टर नुकताच लॉन्च झाला. पार्टीचा फील देणा-या या सिनेमाच्या कलरफुल पोस्टरवरुन सिनेमातील कलाकार कोण आहेत, हे उलगडते आहे. सुव्रत जोशी, अक्षय टांकसाळे, स्तवन शिंदे, रोहित हळदीकर, प्राजक्ता माळी आणि मंजिरी पुपाला ही मराठीतील तरुण कलाकारांची फौज सिनेमात प्रमुख भूमिकेत आहे. नवविधा प्रोडक्शन प्रस्तुत आणि सुपरहिट 'बकेट लिस्ट' सिनेमाचे निर्माते डार्क हॉर्स प्रोडक्शन्स यांच्या सौजन्याने जितेंद्र चीवेलकर, जमाश्प बापुना आणि अमित पंकज पारीख यांनी या सिनेमाच्या निर्मितीची धुरा सांभाळली आहे.

फक्कड मैत्रीची हटके गोष्ट सांगणारी ही खास पार्टी ऑगस्ट महिन्यात आयोजित करण्यात आली असून फ्रेंडशिप डे निमित्त हा सिनेमा आपल्या दोस्तांसोबत एन्जॉय करायला मजा येणार हे मात्र नक्की!

संपूर्ण महाराष्ट्रात ‘पार्टी’ हा सिनेमा २४ ऑगस्ट रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive