सोशल मिडीयावर ऋतु नुसारही विविध ट्रेंड पाहायला मिळतात. सध्या उन्हाळा सुरु असल्याने समर लुक, आंबे याविषयीचे ट्रेंड पाहायला मिळत आहेत. मनोरंजन विश्वातील सेलिब्रिटी अशा पद्धतिचे ट्रेंड मोठ्या प्रमाणात फॉलो करतात शिवाय सोशल मिडीयावर पोस्टही करतात.
आता अभिनेता अभिजीत खांडकेकरने शेयर केलेले फोटोच पाहा ना. सध्या उन्हाळा सुरु असल्याने त्याने एक जबरदस्त असा समर लुक केला आणि त्याचे दोन फोटो सोशल मिडीयावर पोस्ट केले.
गुरुनाथ म्हणून प्रसिद्ध असलेल्या अभिजीतचा हा समर लुक चाहतेही फॉलो करणारच ना. कॅप्शनमध्ये अभिजीत लिहीतो की, "ती समर फिलींग". पांढरा टी-शर्टी, शॉर्ट डेनिम, नियॉन शूज, ब्लॅक गॉगल असा हा समर लुक केला आहे. आता यात सगळ्यात लक्ष वेधतय तर ते अभिजीतचं टी-शर्ट. त्यावर लिहीलय सॅनिटाईज. आता सध्याच्या कोरोना काळात सॅनिटाईज हे महत्त्वाचं आहेच.
'माझ्या नवऱ्याची बायको' या मालिकेतून अभिजीतने गुरुनाथ हे पात्र साकारलं. या मालिकेवर आणि मालिकेतील प्रत्येक पात्रावर प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम केलं. आता अभिजीतचाही मोठा चाहतावर्ग तयार झाला आहे. या चाहत्यांसाठी अभिजीत सोशल मिडीयावर विविध पोस्ट करत असतो.