By  
on  

पाहा Video : या गोष्टीसाठी शनाया फेम रसिकाने पटकावलं प्रमाणपत्र

'माझ्या नवऱ्याची बायको' मालिकेत शनाया साकारणारी अभिनेत्री रसिका सुनीलला बऱ्याच गोष्टी शिकण्याची आवड आहे. अभिनेत्री असलेल्या रसिकाला गायनाची देखील आवड आहे. त्यामुळे रसिकाने त्याचही शिक्षण घेतलं आहे. सध्या रसिका विविध गोष्टी शिकताना दिसतेय. 

कधी ती सर्फिंग शिकते, तर कधी नेमबाजी. नुकतेच तिने विमान उडवण्याचे धडे सुद्धा घेतले होते. तर आता रसिकाने चक्क स्कुबा डायविंग शिकून घेतलय. एवढच नाही तर त्यासाठी तिला प्रमाणपत्रही मिळालय. मालिका, सिनेमांमध्ये वैविध्यपूर्ण भूमिका साकारणाही ही अभिनेत्री आता खऱ्या आयुष्यात विविध गोष्टी शिकून घेत असल्याचं पाहायला मिळतय. याशिवाय तिला स्कुबा डायविंगमध्ये आणखी प्रमाणपत्रे मिळवण्याची इच्छा आहे.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Rasika Sunil (@rasika123s)

नुकतच रसिकाने तिचा स्कुबा डायविंगचा व्हिडीओही शेयर केला आहे. रसिकाच्या सोशल मिडीया अकाउंटवर सध्या तिने शिकलेल्या विविध गोष्टींचे व्हिडीओही पाहायला मिळत आहेत. एका कलाकाराल इतक्या गोष्टी येणं हे त्यांच्यासाठी प्लस पॉईंट ठरतो. तेव्हा या गोष्टींचा रसिकाला तिच्या अभिनय क्षेत्रातही वापर होईल यात शंका नाही.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Rasika Sunil (@rasika123s)

 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive