अखेर ठरलं ! ‘मराठी बिग बॉस’ २च्या नव्या पर्वाचं सुत्रसंचालन यांच्या हाती

By  
on  

मराठी रसिकांच्या मनात अल्पावधीतच जागा मिळवलेला शो म्हणजे मराठी बिग बॉस. या शोच्या पहिल्या पर्वात महेश मांजरेकर यांच्या दमदार सूत्रसंचालनाने रसिकांची दाद मिळवली. आता या शोच्या दुस-या पर्वाचा बिगुल वाजला आहे. हा शो सुरु होणार समजल्यापासून रसिकांची उत्सुकता ताणली गेली आहे.

https://twitter.com/manjrekarmahesh/status/1119614264770056194

या पर्वाचं सुत्रसंचालन कोण करणार या चर्चेलाही आता पुर्णविराम मिळाला आहे. अभिनेते महेश मांजरेकर बिग बॉस मराठी सीझन 2 चे सूत्रसंचालन करणार आहेत. महेश मांजरेकर नुकतेच या कार्यक्रमाच्या एका प्रोमोचे शूट करताना दिसले. यामध्ये महेश एका राजकारण्याच्या वेषात दिसत आहेत. त्यांच्या चेह-यावर नेहमीचं बेरकी हसू देखील दिसत आहे. ‘चर्चेला उधाण येणार...’ या कॅप्शनसोबत हा फोटो शेअर केला आहे. यशस्वी रिअ‍ॅलिटी शोच्या यादीत मराठी बिग बॉसचा नंबर सगळ्यात वर आहे. या शोने प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान मिळवलं आहे. या आगामी पर्वात कोण कोण स्पर्धक असणार याची उत्सुकता रसिकांच्या मनात वाढू लागली आहे.

 

Recommended

Loading...
Share