By  
on  

पाहा Photo : 'सैराट'च्या परश्याचं सह्याद्री पर्वतावर ट्रेकिंग, म्हणतो "आपल्या श्वासांमघ्ये साठवावा सह्याद्री"

'सैराट'चा परश्या म्हणून प्रसिद्ध असलेला अभिनेता आकाश ठोसर सोशल मिडीयावर सक्रिय असतो. सोशल मिडीयावर त्याचा मोठा चाहतावर्ग आहे. त्यामुळे आकाशचे विविध फोटो सोशल मिडीयावर पाहायला मिळतात. आकाशला भटकंतीची, प्रवासाची, ट्रेकिंगची प्रचंड आवड आहे. त्याच्या इन्स्टाग्रामवरही आकाश त्याचे प्रवासाचे आणि ट्रीपचे फोटो शेयर करत असतो.

आकाशने नुकतच सह्याद्री पर्वातावर ट्रेकिंग केलं आहे. याचे खास फोटो त्याने चाहत्यांसाठी इन्स्टाग्रामवर शेयर केले आहेत. 

आकाश या पोस्टमध्ये लिहीतो की, "पहावा सह्याद्री अन् अनुभवावा सह्याद्री, आपल्या श्वासांमघ्ये साठवावा सह्याद्री". आकाशने याआधीही त्याच्या ट्रेकिंगचे फोटो शेयर केले आहेत. तेव्हा आकाशची ही आवड सगळ्यांना पाहायला मिळतेय. 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive