अनेकांना विविध गोष्टीचा फोबिया, भिती असते. काही त्या भितीवर मात करण्याचाही प्रयत्न करतात. अभिनेता जितेंद्र जोशीला उंची, उंचावरील जागेचा फोबिया आहे. आणि याच भितीवर जितेंद्रने नुकतीच मात केली आहे.
जितेंद्रने सोशल मिडीयावर एक व्हिडीओ शेयर केला आहे. या व्हिडीओत जितेंद्र पॅराग्लायडिंग करताना दिसतोय. हा हवेतील एक उड्डाण विषयक एक्शन स्पोर्ट्स आहे. यात विशिष्ट प्रकारच्या कापड आणि दोरीच्या सहाय्याने पंख तयार करून ते हार्नेसला जोडून चालक त्यात बसतो. उंचीचा अनुभव आणि एक वेगळा थरार पॅराग्लायडिंग करण्यात असतो. हेच नुकतच जितेंद्र जोशीने अनुभवलं आहे.
या पोस्टमधून त्याने उंचीच्या फोबियावर कशी मात केली आहे याविषयी सांगतो. तो लिहीतो की, "माझा सगळ्यात मोठा फोबिया म्हणजे उंची. आणि आज मी जे केलय त्याचं कधी स्वप्नही पाहिलं नव्हतं. मी आकाशात उडत होतो आणि विश्वास करा मला आज विलणक्षणचा खरा अर्थ कळाला. आता हे रोज करण्याची इच्छा व्यक्त करतो."
हिमाचल प्रदेश येथील ट्रीपला असताना जितेंद्रने पॅराग्लायडिंग केलं आहे आणि त्याचाच हा व्हिडीओ आहे.