‘मराठी बिग बॉस २’ ला यावेळी असणार राजकारणाचा तडका? असा आहे नवा प्रोमो

By  
on  

‘मराठी बिग बॉस २चे’ पडघम वाजण्यास सुरुवात झाली आहे. या पर्वाच्या सुत्रसंचालनाची धुरा आता महेश मांजरेकरांच्या हाती आहे. विशेष म्हणजे या प्रोमोच्या रिलीज पुर्वीच राजकारण्याच्या वेषातील महेश यांनी आगामी पर्वात काहीतरी वेगळं असल्याचं सुतोवाच केलं होतं. आताच्या प्रोमोमध्येही एका कवी मनाच्या नेत्याची सभा चालू असल्याचं दिसत आहे. लोकांना आश्वासन देत हा नेता कवितेतून आपल्यालाच मतदान करण्याचं आवाहन करतो. यावेळी तिथे असलेले महेश मांजरेकर ‘कविता करणारा हा नेता बनणार का या बिग बॉसचा विजेता?’ असा प्रश्न करतानाही दिसतात. यावरून बिग बॉसच्या आगामी पर्वात राजकारणी दिसणार की बिग बॉसचे स्पर्धक जिंकण्यासाठी राजकारण करणार हे लवकरच कळेल.

https://twitter.com/manjrekarmahesh/status/1119852323960963077

Recommended

Loading...
Share