By  
on  

पाहा Video : ‘वेल डन बेबी’ चित्रपटातील ‘हलकी हलकी’ गाणं प्रदर्शित

अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडिओचा आगामी चित्रपट ‘वेल डन बेबी’चं नवं गाणं नुकतच प्रदर्शित करण्यात आलय. ‘हलकी हलकी’ असे या गाण्याचे बोल आहेत. या चित्रपटात अभिनेता पुष्कर जोग, अमृता खानविलकर आणि वंदना गुप्ते मुख्य भूमिकेत आहेत.

पुष्कर आणि अमृतावर हे गाणं चित्रीत करण्यात आलय. या गाण्यात पुष्कर-अमृताचे पात्र भावनिक क्षणातून जाताना दिसत आहेत, शिवाय त्यांना काही रोमँटिक क्षणही आठवत आहेत.  रोहन-रोहन यांनी या गाण्याला संगीत दिलं आहे. तर रोहन प्रधान यांनी हे गाणं गायल. वलय मुळगुंड यांनी हे गीत लिहीलं आहे. 

या चित्रपटाच्या निमित्ताने पुष्कर जोग आणि अमृता खानविलकर ही जोडी पहिल्यांदाच एकत्र झळकणार आहे. तर त्यांच्या जोडीला प्रसिद्ध अभिनेत्री वंदना गुप्ते यांची उत्तम साथ आहे.

मागील वर्षी हा चित्रपट प्रदर्शित होणार होता, मात्र कोरोनाग्रस्त परिस्थितीत हा चित्रपट आता ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होत आहे. प्रियंका तन्वर यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. येत्या 9 एप्रिल 2021 रोजी हा चित्रपट अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडीओवर प्रदर्शित होणार आहे.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive