By  
on  

झी समुहाची नवी वाहिनी 'झी चित्रमंदिर', वाहिनीवर पाहायला मिळणार गाजलेले मराठी चित्रपट

 लवकरच मराठी प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी नवी मराठी वाहिनी भेटीला येत आहे. "मराठी मनात, मराठी घरात" म्हणत मराठी चित्रपटांसाठी नवं क्षितिज खुलं करणाऱ्या या नव्या वाहिनीचं नाव असेल 'झी चित्रमंदिर'.

झी समूहाने आत्तापर्यंत विविध भाषिक वाहिन्यांमधून प्रेक्षकांचं मनोरंजन केलेलं आहे. त्यामुळे आता पुन्हा ते काहीतरी नवं घेऊन येत आहेत. ही नवीकोरी वाहिनी मराठी चित्रपटांशी संपूर्णपणे वाहून घेतलेली आहे. जिथे प्रेक्षकांना प्रसिद्ध चित्रपटांसोबत कीर्तनाचाही आस्वाद घेता येणार आहे. 

 फ्री डिश वरती "झी चित्रमंदिर" या वाहिनीचा आस्वाद घेण्यासाठी प्रेक्षकांनी सेट टॉप बॉक्सला री ट्यून /ऑटो ट्यून करणे गरजेचे असेल. या नव्या येणाऱ्या वाहिनीबद्दल सांगताना या वाहिनीचे बिझीनेस हेड बवेश जानवलेकर म्हणाले, " झी टॉकीज या महाराष्ट्रातील सर्वाधिक लोकप्रिय वाहिनी म्हणून पसंती मिळवलेल्या चित्रपट वाहिनीला प्रक्षकांनी भरपूर प्रेम दिले. आपल्या महाराष्ट्र राज्यात फ्री डिश बघणारा मोठा प्रेक्षक वर्ग आहे. त्यांना उत्तमोत्तम चित्रपटांचा तसेच, कीर्तनाचा आनंद मिळावा हा झी चित्रमंदिर वाहिनीचा प्रमुख उद्देश असणार आहे. झी टॉकीज प्रमाणेच झी चित्रमंदिर या वाहिनीला सुद्धा महाराष्ट्राचे रसिक प्रेक्षक उत्तम प्रतिसाद देतील हा आम्हाला विश्वास आहे. मराठी मनात, मराठी घरात हे आमचं ब्रीदवाक्य खऱ्या अर्थाने सार्थकी लागेल अशी आम्हाला आशा आहे."

 नुकतीच ही वाहिनी लाँच करण्यात आली आहे.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive