या अभिनेत्रीला आला उन्हाळ्याचा थकवा, शेयर केली ही पोस्ट

By  
on  

'सैराट'ची आर्ची म्हणजेच रिंकू राजगुरु आता विविध चित्रपटांमधून समोर येतेय. आर्चीही ओळख पुसून काढत रिंकू ती एक उत्तम अभिनेत्री असल्याचं सिद्ध करतेय. आगामी प्रोजेक्ट्समधून रिंकू वैविध्यपूर्ण भूमिका साकारताना दिसेल. 

लवकरच रिंकू आणखी विविध प्रोजेक्ट्समध्ये पाहायला मिळणार आहे. नुकतच रिंकूने चित्रीकरणाच्या सेटवरील फोटो शेयर केला आहे. उन्हाळ्यात शूटींग करत असल्याने रिंकूला थकवा आल्याचं ती या पोस्टमध्ये सांगतेय. थकवा आल्याने रिंकू सेटवर आराम करताना दिसतेय.

 

तेव्हा रिंकू नेमक्या कोणत्या प्रोजेक्टचं चित्रीकरण करतेय हे अद्याप समोर आलेलं नाही. मात्र गेल्या काही दिवसांपासून रिंकू तिच्या सेटवरील अपडेट्स सोशल मिडीयावर शेयर करतेय. 

'छुमंतर' या द्विभाषिक चित्रपटात रिंकू झळकणार आहे. ज्याचं चित्रीकरण तिने भारताबाहेर केलय. या चित्रपट रिंकूसह प्रार्थना बेहेरे, सुव्रत जोशी, ऋषि सक्सेना हे कलाकार झळकणार आहेत. याशिवाय 'आठवा रंग प्रेमाचा' या मराठी चित्रपटातही रिंकू वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे. नुकताच या चित्रपटाचा फर्स्ट लुक प्रदर्शित करण्यात आला होता.

Recommended

Loading...
Share