पाहा Video : रितेश देशमुखने अशी केली परेश रावल आणि राजपाल यादवची नक्कल, व्हिडीओ पाहून खूप हसाल

By  
on  

अभिनेता रितेश देशमुख सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असतो. रितेशसह पत्नि जेनेलिया देखील सोशल मिडीयावर सक्रिय असते. विशेषकरुन दोघांचे विविध मजेशीर व्हिडीओ नेटकऱ्यांचं लक्ष वेधतात. एवढच नाही तर त्यांचे व्हिडीओही व्हायरल होत असतात. रितेशने नुकताच असाच एक मजेशीर व्हिडीओ शेयर केला आहे.

'हेरा फेरी' आणि 'फिर हेरा फेरी' या प्रसिद्ध कॉमेडी सिनेमांचे डायलॉग सोशल मिडीयावर आजही प्रचंड व्हायरल होत असतात. अनेक जण सोशल मिडीयावर या डायलॉगवर व्हिडीओ करताना दिसतात. अभिनेता रितेश देशमुखनेही हे करुन पाहिलय. रितेशने चक्क परेश रावल आणि राजपाल यादव यांचा प्रसिद्ध कॉमेडी सीन केलाय. यासाठी त्याने खास लुकही केला. नेटकऱ्यांना आणि रितेशच्या चाहत्यांना हा व्हिडीओ प्रचंड आवडलाय. हा व्हिडीओ सगळ्यांना पोटधरुन हसायला लावेल यात शंका नाही. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Riteish Deshmukh (@riteishd)

 

रितेश या पोस्टमध्ये हे देखील म्हणतो की, "परेश भाई आणि राजपाल यादव हे दोघही माझे आवडते आहे.त्यांच्या कॉमीक टायमिंगला सॅल्यूट " 

रितेशचा सोशल मिडीयावर मोठा चाहतावर्ग आहे. या चाहत्यांसाठी तो मजेशीर गोष्टी पोस्ट करताना दिसतो. त्याचे कॉमेडी व्हिडीओ तर चाहत्यांना प्रचंड आवडतात.

Recommended

Loading...
Share