By  
on  

सोनाक्षी आहे, नवीन हॅप्पी ; हटके अंदाजात करणार प्रेक्षकांचं मनोरंजन

‘हॅप्पी भाग जाएगी’ या 2016 मध्ये प्रदर्शित झालेल्या सिनेमाचा सिक्वेल ‘हॅप्पी फिर भाग जाएगी’  हा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. यावेळेस जुनी हॅप्पी डायना पेण्टीसोबत नवीन हॅप्पी सोनाक्षी सिन्हा आपल्या हटके अंदाजात प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यास सज्ज झाली आहे. नुकताच या नव्या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाला.

https://youtu.be/-HlzmWaFcG8

‘हॅप्पी फिर भाग जाएगी’चा ट्रेलर पाहून खळखळून हसायला येते. धम्माल-मस्ती आणि चक्रावून टाकणारा असा हा ट्रेलर आहे. सिनेमात हरप्रीत कौरच्या व्यक्तिरेखेत डायना पेण्टी आहे, तर सोनाक्षी सिन्हाला नवप्रीत कौरच्या भूमिकेत पाहायला मिळेल. जिमी शेरगिल, अली फजल, अभय देओल आणि पियुष मिश्रा यांच्यासोबतच पंजाबी गायक-अभिनेता जेसी गिलसुद्धा महत्त्वपूर्ण भूमिकेत आहे.

सिनेमाच्या मोशन पोस्टरमध्ये दबंग गर्ल सोनाक्षी खुपच कन्फ्युज दिसून येत आहे. तसंच तिच्या बाजूला जुनी हॅप्पी डायना पेण्टीचा एक फोटो दिसतोय, ज्यावर वॉटेंड असं लिहलं आहे. त्यामुळे भरपूर धम्माल असणार हे नक्की.

‘हॅपी भाग जाएगी’मध्ये हॅप्पी (डायना) आपल्या प्रियकरासोबत (अली फजल) पळून जाते आणि थेट पाकिस्तानला पोहोचते. आता ‘हॅपी फिर भाग जाएगी’ सिक्वलमध्ये काय पाहायला मिळणार, याची उत्सुकता प्रेक्षकांना आहे. मुदस्सीर अजीज ज्यांनी पहिल्या सिनेमाचे दिग्दर्शन केले होते तेच या सिक्वेलचे दिग्दर्शक आहेत.

येत्या 24 ऑगस्ट रोजी ‘हॅप्पी फिर भाग जाएगी’ हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे.

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive