सोज्वळ आणि सालस व्यक्तिरेखा साकारणारी अभिनेत्री म्हणजे मृण्मयी देशपांडे. अभिनयात स्वत:च्या कामाचा ठसा उमटवल्यानंतर मृण्मयी आता दिग्दर्शनाकडे वळली आहे. ती करीअरमधील दुसरा सिनेमा दिग्दर्शित करणार आहे. ‘मनाचे श्लोक’ असं तिच्या नव्या सिनेमाचं नाव आहे. या सिनेमाचा मुहुर्त नुकताच पार पडला. रॅपर श्रेयश जाधव या सिनेमाचा सहनिर्माता आहे. श्रेयशने क्लॅपिंगचा एक फोटो शेअर करत या सिनेमाची माहिती दिली आहे.
https://www.instagram.com/p/Bwgl2AcF53u/?utm_source=ig_web_copy_link
मनाचे श्लोक ही मृण्मयी दिग्दर्शित करत असलेला दुसरा सिनेमा आहे. तिचा पहिला सिनेमा लवकरच रसिकांच्या भेटीला येईल. या सिनेमात कोण कोण कलाकार असतील याबद्दल अजून काही वृत्त हाती आले नसले तरी रसिकांना मृण्मयीच्या नव्या सिनेमाची उत्सूकता आहे.