By  
on  

सिद्धार्थ-सईचा हा मजेशीर डान्स पाहिलात का? तुम्हीही व्हाल फॅन

मराठी कलाकार एकमेकांचे अत्यंत चांगले मित्र आहेत. याचा प्रत्यय अनेकदा येत असतो. अनेकदा सोशल मिडियावर एकमेकांसोबतचे व्हिडियो शेअर करत असतात. अलीकडेच सिद्धार्थ जाधव आणि सई ताम्हणकर यांचा एक भन्नाट व्हिडियो शेअर केला आहे. यात दोघेही गोविंदा आणि करिश्माच्या गाण्यावर नृत्य करताना दिसत आहेत. हा व्हिडियो एका प्रवासातील आहे. यात सई मागच्या सीटवर बसून सिद्धार्थला या धमाल नृत्यात साथ देताना दिसत आहे. या व्हिडियोला कॅप्शन देताना सिद्धार्थ म्हणतो, ‘हिम्मतराव आणि राधिका मॅडम पुन्हा एकदा...’ ‘दोन वेडे एकाच फ्रेममध्ये’ असंही या पोस्टमध्ये तो म्हणत आहे. या व्हिडियोला नेटिझन्सच्या लाईक्सचा वर्षाव होत आहे.

https://www.instagram.com/p/Bwj233-A_oa/?utm_source=ig_web_copy_link

Author

Recommended

PeepingMoon Exclusive