By  
on  

हे आहे रिंकू राजगुरुचं रिलेशनशिप स्टेटस, चाहत्याच्या प्रश्नाला दिलं हे उत्तर

अभिनेत्री रिंकू राजगुरु सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात चर्चेत असते. सैराट या सिनेमानंतर आर्ची म्हणून प्रसिद्ध झालेल्या रिंकूचा आता मोठा चाहतावर्ग आहे. या सिनेमाची जादू आजही कायम आहे. त्यामुळे आजही रिंकूला आर्ची म्हणून ओळख आहे. सैराटनंतर रिंकू अनेक सिनेमांमध्ये झळकली. त्यानंतर एक उत्तम अभिनेत्री म्हणून तिला स्वत:ला सिद्ध केलं आहे. 

रिंकू सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. दररोज रिंकूच्या विविध पोस्ट पाहायला मिळतात. कधी रिंकू तिचे फोटो शेयर करते तर कधी व्हिडीओ. कधी तिच्या व्यायामाविषयी सांगत फिट फोटो पोस्ट केला जातो तर कधी शूटींगच्या सेटवरील मस्ती रिंकू शेयर करते. नुकतच रिंकूने तिच्या चाहत्यांसाठी #Askmeanything ही पोस्ट केली होती. म्हणजेच चाहत्यांनी प्रश्न विचारायचे आणि रिंकूने त्याची उत्तर द्यायची.

रिंकूची ही पोस्ट पाहून चाहत्यांनी प्रश्नांचा भडीमार केला. रिंकूनेही विविध प्रश्नांची सडेतोड उत्तरं दिली. यातच एका चाहत्यांनी रिंकूला चक्क तिचं रिलेशनशिप स्टेटस विचारलं. चाहत्याने रिंकूला तिचा बॉयफ्रेंड आहे की नाही हे विचारलं. रिंकूने या प्रश्नाचं उत्तर देणं न टाळता तिचं रिलेशनशिप स्टेटस सांगीतलं. रिंकूने या प्रश्नावर नाही असं उत्तर दिलं. तेव्हा मोठ्य पडद्यावर बिनधास्त अंदाजात दिसणारी रिंकू खऱ्या आयुष्यातही किती बिनधास्त आहे हे देखील यातून पाहायला मिळतय.

आगामी 'छुमंतर' या द्विभाषिक सिनेमात रिंकू झळकणार आहे. मागील वर्षी 'हंड्रेड' या वेबसिरीजमध्ये रिंकूने ओटीटीवर पदार्पण केलं होतं. त्यानंतर 'अनपॉज्ड' या वेब फिल्ममध्येही रिंकू झळकली. 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive