सध्याच्या कोरोनाग्रस्त परिस्थितीत घरबसल्या मनोरंजनासाठी प्रेक्षकांकडे बरेच पर्याय आहेत. यातच झी टॉकीजने आणखी एक पर्याय प्रेक्षकांसाठी खुला केलाय. रविवारचा दिवस मनोरंजनने भरपुर असण्यासाठी टॉकीज मनोरंजन लीग प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. झी टॉकीज वाहिनीवर सध्या झी टॉकीज मनोरंजन लीग सुरु आहे.
या लीगमध्ये एप्रिल महिन्याच्या प्रत्येक रविवारी संपूर्ण दिवस ब्लॉकबस्टर चित्रपट प्रसारित केले जाणार आहेत. यात भक्तिपर आणि कॉमेडी चित्रपटांची मेजवानी प्रेक्षकांनी अनुभवली आणि आता येत्या रविवारी टॉकीज मनोरंजन लीग मध्ये ऍक्शन चित्रपटांचा धमाका होणार आहे. एका पेक्षा एक ऍक्शन चित्रपट येत्या रविवारी प्रेक्षकांसाठी सादर होणार आहे. प्रार्थना बेहरे आणि वैभव तत्ववादी या सुपरहिट जोडीचा 'मिस्टर अँड मिसेस सदाचारी' हा चित्रपट प्रेक्षकांच्या अभेटीस येईल. तर ब्लॉकबस्टर चित्रपट 'मुळशी पॅटर्न', लक्ष्मीकांत बेर्डे यांचा सदाबहार चित्रपट 'धडाकेबाज' आणि 'माझा छकुला' हे धमाकेदार चित्रपट प्रसारित करण्यात येतील. अभिनेता रितेश देशमुखचा 'लय भारी' या चित्रपटाने टॉकीज मनोरंजन लीग मधील ऍक्शन चित्रपटाच्या मॅरेथॉनचा शेवट होईल.