By  
on  

रिंकू शुभंकरमध्ये घुमतोय ‘दरवळ मव्हाचा’, ‘कागर’चं नवं गाणं रिलीज

सध्या ‘कागर’ या सिनेमाच्या ट्रेलरने रसिकांच्या मनावर गारुड केलं आहे. या सिनेमातील ‘दरवळ मव्हाचा’ हे गाणं रिलीज झालं आहे. या गाण्यात शुभंकर आणि रिंकूची सिझलिंग केमिस्ट्री दिसून येत आहे. विशेष म्हणजे या गाण्यात रिंकूच्या अदाही खास दिसून येत आहेत.

https://www.youtube.com/watch?v=JUvh4yR5pmE

हे गाणं रिंकूच्या आतापर्यंतच्या गाण्यापेक्षा वेगळं आहे. या रिंकूचा बोल्ड अवतार दिसून येत आहे. या गाण्यात रिंकू आणि शुभंकरच्या लग्नाचं चित्रण आहे. यात ती शुभंकरला ‘पर्मनंट लव्ह’ची शपथ देते. हे गाणं कविता राम, विवेक नाईक, राहुल चिटणीस आणि संतोष बोटे यांनी गायलं आहे. वैभव देशमुख यांनी या गाण्याचे बोल लिहिले आहेत. संगीत ए व्ही प्रफुल्लचंद्र यांचं आहे. सुधीर कोलते आणि विकास हांडे यांच्या ‘उदाहरणार्थ’ या संस्थेने सिनेमाची निर्मिती केली आहे. राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त मकरंद माने यांनी कागरचं दिग्दर्शन केलं आहे. हा सिनेमा २६ एप्रिल २०१९ रोजी रिलीज होणार आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive