पाहा Video : 'टकाटक' स्टार प्रथमेश परबची सायकल राईड, सेटवर अशी केली धमाल

By  
on  

'टकाटक' या सिनेमाला मिळालेल्या यशानंतर आता दिग्दर्शक मिलिंद कवडे या सिनेमाचा दुसरा भाग घेऊन येत आहेत. नुकताच या सिनेमाचा बोल्ड फर्स्ट लुक पोस्टर प्रदर्शित करण्यात आला. नुकतच या सिनेमाच्या चित्रीकरणाला गोव्यात सुरुवात झाली आहे. याच दरम्यान या सिनेमातील कलाकार सोशल मिडीयावर सेटवरील काही मजेशीर क्षण शेयर करत आहेत.

अभिनेता प्रथमेश परब या दुसऱ्या भागातही झळकणार आहे. तेव्हा नुकतच प्रथमेशने सेटवरील एक व्हिडीओ शेयर केला आहे. या व्हिडीओत प्रथमेश सायकल राईडची मजा लुटताना दिसत आहे. गोव्यात शूटींग सुरु असल्याने गोव्याच्या निसर्गरम्य वातावरणात हे कलाकार शूटीगंच्या ब्रेकमध्ये धमाल करताना दिसत आहेत. अभिनेता अजिंक्य राऊत आणि अक्षय केळकर हे कलाकारही या सिनेमात महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. तेव्हा प्रथमेश, अजिंक्य, अक्षय यांची चांगलीच ऑफस्क्रिन केमिस्ट्री सोशल मिडीयावरील पोस्टमधून पाहायला मिळतेय. तेव्हा ऑनस्क्रिन ही यंग ब्रिगेड कमाल करणार यात शंका नाही. 

 

या कलाकारांनी सोशल मिडीयावर सिनेमाच्या सेटवरील अनेक फोटो शेयर केले आहेत. त्यावरुन यंदा दुसऱ्या भागात धमाल होणार असं चित्र दिसतय.

Recommended

Loading...
Share