By  
on  

"घरचे मलाच शिजवून खातील" म्हणत या अभिनेत्याने घरकोंबडा झाल्याची केली पोस्ट

देशात आता कोरोनाची दुसरी लाट आल्याने कोरोनाचा फैलाव वाढला आहे. त्यामुळे केंद्र सरकारने सध्या संचारबंदी लागू करण्यात आली आहे. कोरोनाग्रस्त परिस्थिती अशा लॉकडाउनमुळे घरातच रहावं लागतय. यात अनेक बंधने आणि नियमावलीही जाहीर केली आहे. अभिनेता संतोष जुवेकरही घरात राहुन कंटाळल्याचं पाहायला मिळतय. 

संतोषने नुकतीच सोशल मिडीयावर पोस्ट शेयर केली आहे. तो लिहीतो की, "एवढा घरकोंबडा झालोय की आता भिती वाटायला लागलीये, की एखाद्या रविवारी घरचे मलाच् शिजवून खातील कि काय?  देवा संपुदेरे हे lockdownच चक्र आणि ह्या corona च संकट पार धंद्याला लागलो आता कामाला लगुदेरे महाराजा"

 

पुन्हा लॉकडाउनचं चक्र सुरु झाल्याने घरकोंबडा झाल्याचं संतोष या पोस्टमध्ये म्हणतोय. सोशल मिडीयावर संतोषचे बरचे चाहते आहेत. या चाहत्यांसाठी तो विविध पोस्ट करताना दिसतोय. विशेषकरुन अशा मजेशीर पोस्टसाठी संतोष चर्चेत असतो. सध्या अनेक हिंदी वेबसिरीजच्या माध्यमातून संतोष प्रेक्षकांचं मनोरंजन करतोय.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive